suresh prabhu aviation

देशात शंभर नवीन विमानतळ उभारण्याची सुरेश प्रभू यांची घोषणा

देश व्यापार

येणाऱ्या लोकसभा निवडणुकी पूर्वी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा हवाई परिवहन मंत्री श्री.सुरेश प्रभू यांनी देशात येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षात शंभर नवीन विमानतळे उभारण्याची घोषणा केली आहे. यामध्ये जवळपास ४२६० अरब (६० अरब डॉलर) रुपयांची  गुंतवणूक केली जाणार आहे. या विमानतळांचे निर्माण पीपीपी सूत्रांनुसार केले जाणार आहे. हवाई परिवहन मंत्री श्री.सुरेश प्रभू यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानचालन समिट मध्ये याची माहिती दिली. यावेळी श्री.प्रभू यांनी सांगितले की भारतीय अर्थव्यवस्थेच्या जलद वाढीमुळे, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील रहदारीत वाढ होत आहे. यामुळे पुढील दहा ते पंधरा वर्षांमध्ये देशात शंभर नवीन विमानतळे उभारण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *