302285-kol

कोलकातामध्ये मोठी दुर्घटना,माजेरहाट पूल कोसळून एकाचा मृत्यू

Uncategorized

कोलकातामधील माजेरहाट पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. कोलकाता दक्षिणकडील माझेरहाट पुलाचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृति चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तसेच पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर एनडीआरफच्या तीन टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही गाड्या आणि लोक दबले असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून तीन लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *