suresh prabhu

सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने भारत आणि मोरोक्को दरम्यान हवाई सेवा सुविधांकरिता मंत्रिमंडळाची मंजुरी

देश व्यापार

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा हवाई परिवहन मंत्री श्री.सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्रिमंडळात भारत आणि मोरोक्को यांच्या दरम्यान सुरु होणाऱ्या हवाई सेवा सुविधांकरिता स्वाक्षरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
विमान सेवेबद्दल असलेली सुरक्षा, व्यापार विषयक असलेल्या नियमावली बदलत्या काळानुसार योग्य तथा लागू नसल्याने हा नवीन करार सुरु झाल्यानंतर डिसेंबर २००४ मध्ये केला गेलेला करार रद्द होणार आहे. भारत आणि मोरोक्को दरम्यान सुरु होणाऱ्या नवीन करारामुळे दोन्ही देशामध्ये व्यापार वृद्धी, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण केली जाईल. यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात मोठी वृद्धी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *