suresh prabhu in singapur

सुरेश प्रभू यांच्या उपस्थित सिंगापूर येथे आर्थिक भागेदारी विषयक बैठक संपन्न

देश विदेश व्यापार

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा हवाई परिवहन मंत्री श्री.सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थित सिंगापूर येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सहाव्या क्षेत्रीय समग्र आर्थिक भागेदारी (आरसीईपी) मंत्री स्थरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भारताकडून श्री.सुरेश प्रभू यांनी नेतृत्व केले. सदर बैठकीचे आयोजन दिनांक ३० ते ३१ ऑगस्ट २०१८ या दरम्यान करण्यात आले होते. श्री.सुरेश प्रभूजी आशियातील दहा देश तसेच सहा आशिया एफटीए भागीदारीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये, भारत,चीन,जपान,कोरिया,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश सामील झाले होते.

१ सप्टेंबर २०१८ ला श्री.प्रभू यांनी ६व्या पूर्व आशिया आर्थिक मंत्री मंडळाच्या (ईएएस-ईएमएम) बैठकीमध्ये सहभाग घेतला होता. या बैठकीमध्ये आशियातील दहा देशांमधील व्यापार तसेच भारत, चीन, अमेरिका, रशिया , जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या सहित आठ आशियाई संवाद सहभागी झाले होते. या सर्व देशांतील अर्थ मंत्र्यांनी जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा केली तसेच व्यापारांमधील असलेल्या विविध नियमावर देवाण घेवाण केली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *