bus-accident

रायगड जिल्हा लोणेरेजवळ शिवशाही बसला अपघात

कोकण

रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला असून या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत.शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दापोलीवरुन पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस दापोलीवरुन पुण्याकडे निघाली होती.
लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ हा अपघात घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसच्या अपघाताच्या घटना वाढत असून यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *