2018_1image_11_51_082682000as-ll

पालघर येथे ऑनलाईन अंत्यसंस्कार

देश

पालघर येथे ऑनलाईन अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले आहे.पालघरमधील ६५ वर्षीय महिलेचे अंत्यसंस्कार गुजरातमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीने ऑनलाईन व्हिडीओ कॉलद्वारे केल्याचे समोर आले आहे. ऐवढेच नाही तर आपल्या आईच्या अस्थी कुरियरने गुजरातला मागवल्या आहेत. सोशल मीडियामध्ये सध्या हा विषय चर्चेचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये धीरज पटेल (७०) आणि निरीबाई पटेल(६५) हे दाम्पत्य राहत होते. यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालं. मंगळवारी धीरज पटेल कामानिमित्त बाहेर गेले होते तेव्हा त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले. घरी कोणी नसल्यामुळे शेजरील लोक जमा झाले. शेजाऱ्यांनी अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मुलीला फोन करून आईचे निधन झाल्याचे सांगितले. त्यावर मुलीने आपण येऊ शकत नसल्याचे सांगितले. फोनवर मुलीने शेजाऱ्यांना अंत्यसंस्कार करा आणि मला व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन द्या असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *