Indian-hockey-Team

Asian Games 2018 भारताची जपानवर ८-० ने मात,हॉकी संघाचा नवीन विक्रम

क्रीडा

जपानवर ८-० ने मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. जपानवरील विजयानंतर भारतीय संघाने एशियाड स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. १९८२ साली झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावावर आधी या विक्रमाची नोंद होती. झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४५ गोलची नोंद केली होती. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत ५१ गोलची नोंद केली आहे.आशियाई स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्यास भारतीय संघाला २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *