images

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे १०० डॉक्‍टरांचे पथक रवाना !

देश मुंबई

केरळमधील महापूर ओसरल्यानंतर तेथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुरात अडकलेले नागरिक सावरत असताना तेथे आता रोगराईने डोके वर काढले आहे. रोगराईपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी स्थानिक डॉक्‍टरांच्या मदतीला महाराष्ट्र पुन्हा धावून गेला आहे.केरळकडे सध्या मदतीचा ओघ सुरू असला तरी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आज विशेष विमानाने १०० डॉक्‍टरांसह औषधांचा साठा केरळला पाठवला. जे. जे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्‍टर श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ५० डॉक्‍टर, तर ससून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्‍टर गजानन भारती यांच्या मार्गदर्शनात २६ डॉक्‍टर, इतर स्वयंसेवक व सहायकांसह १०० व्यक्तींचे पथक वैद्यकीय सहायता पुरविणार आहे. यात सर्जरी, मेडीसीन, बालरोग,स्त्रीरोग, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडीसीनच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.
केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा पुढाकार घेतला असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पाठविण्यात आली आहे. त्यात अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादींचा समावेश असून, केरळ सरकारने मागितलेल्या निकडीच्या बाबी यात प्राधान्याने पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *