4c4154fae9fd8193a27b6d003cabb43a

माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतुकीवर मोठा परिणाम

महाराष्ट्र

माळशेज घाटात आज (मंगळवार, २१ ऑगस्ट) पहाटे दरड कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.
कल्याण-अहमदनगर महामार्गावर जवळपास १० किलोमीटर अंतरात माळशेज घाट आहे. या घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळली असून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पुर्णतः थांबवण्यात आली. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पाऊस आणि धुके यामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
दरम्यान, दरड कोसळून मार्गावर साचलेले दगड, माती हटवून मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *