8582394b-b1d8-4363-a225-f32572f87888-large16x9_EarthquakeMGN

संगमनेर भागात भूकंपाचे सौम्य धक्के

महाराष्ट्र

संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरामध्ये आज सकाळी साडेआठच्या सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्रशासनाने याची दखल घेतली असून संगमनेरचे तहसीलदार घटनास्थळी पाहणीसाठी रवाना झाले.
गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव आदी भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत होते. आज सकाळी सुद्धा सौम्य धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली असली तरी प्रशासन याबाबत अधिकृत माहिती घेत आहे. तसेच कोणत्याही अफवा पसरवू नये अशी आवाहन देखील करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *