c057787f86f854071ab4493b7e1e5ced

अटल बिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप

देश

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्मृती स्थळावर हे अंत्यसंस्कार पार पडले. मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलींना मुखाग्नी दिला. त्यापूर्वी अटलजींना लष्कराच्या ३०० जवानांनी मानवंदना दिली. तीनही सेनादलांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. अटलींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांना अश्रू अनावर झाले होते.
अटलींच्या अंत्ययात्रेला दिल्लीत लाखो लोकांनी गर्दी केली होती. एका फुलाने सजवलेला ट्रकवर अटलजींचं पार्थिव होतं, यामागे हजारो नागरिक, कार्यकर्ते धावत होते. अटलबिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. अटल बिहारी वाजपेयी यांना निरोप देण्यासाठी भाजपाचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी कालच दिल्लीत दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *