7cd5dacd83d46993219ab4bc013fceea

आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही

देश

तुम्हाला आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्ससची मूळ प्रत दाखविण्याची गरज राहणार नाही. केवळ मोबाईलमधील ई-कॉपी दाखवली तरी पुरेसे आहे. तसे निर्देशच केंद्र सरकारने राज्यांमधील ट्रॅफिक पोलिस व परिवहन विभागांना दिले आहेत.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्रॅफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्रॅफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.
अनेकदा भरधाव वेगाने गाडी चालवणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे तसंच गाडी चालवताना फोनवर बोलणे अशा प्रकरणी ट्रॅफिक पोलीस कारवाई करत कागदपत्रं जप्त करतात. मात्र अनेकदा ही कागदपत्रं पोलिसांकडून हरवली जातात. अशा वेळी आपली कागदपत्रं पुन्हा मिळवण्यासाठी लोकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग ती मिळवू शकलेला नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ई डेटाबेसच्या आधारे पोलीस संबंधित वाहन आणि वाहनचालकाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात. त्यासाठी कागदपत्रांची मूळ प्रत जमा करण्याची काहाही गरज नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *