Mulund-dumping-ground

अखेर मुलुंडचे डम्पिंग ग्राऊंड ऑक्टोबरपासून बंद

मुंबई

पालिकेने मुलुंड कचराभूमी बंद करण्याचा निर्णय घेतला असून या कचराभूमीतील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे.न्यायालयाने घेतलेली कडक भूमिका आणि स्थानिक रहिवाशांचा वाढता विरोध यामुळे अखेर पालिकेने येत्या १ ऑक्टोबरपासून मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय घेतला असून कचराभूमीतील ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. याकरिता तब्बल ५५८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही कचराभूमी १ ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार असल्यामुळे मुलुंड आणि आसपासच्या उपनगरांतील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईमध्ये दररोज निर्माण होणारा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीत टाकण्यात येत आहे. या कचराभूमींमध्ये कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढत असून आसपासच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. यामुळे या भागांतील रहिवाशांकडून कचराभूमींना कडाडून विरोध होऊ लागला आहे. वाढते प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *