Top-5-Marathi-TV-shows-Peoples-TRP-chart-for-August-2017

‘माझ्या नवऱ्याची बायको’ राधिका बनणार गुरुनाथच्या कंपनीची मालकीण

मनोरंजन

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.
गुरुनाथच्या हलगर्जीपणामुळे ए.एल.एफ. कंपनी देशोधडीला लागली आहे. त्याला शोकॉज नोटीस देऊन देखील कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये काही फारसा फरक पडला नाही आणि त्यामुळेच गुरूच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले असून ते त्याला धारेवर धरतात. या सगळ्या काटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो पण त्याच्या या बोलण्याला न जुमानता त्याचे बॉस त्याला नुकसान भरपाई करण्याची चेतावनी देतात. ए.एल.एफ.च्या ढासळत्या स्थितीमध्ये कंपनीचे सध्याचे भागीदार ए.एल.एफ.चे शेअर्स एखाद्या मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीला विकायचं ठरवतात. त्यासाठी ते ३ कंपनी शॉर्टलिस्ट करतात त्यातील एक राधिका मसाले ही एक आहे. राधिकाला ही ऑफर मिळाल्यावर तिच्याकडे गुरुनाथचा अहंकार ठेचायची एक चांगली संधीच मिळाली आहे. आता राधिका ए.एल.एफ.ची नवीन मालकीण होऊन कशाप्रकारे गुरुनाथ आणि शनायाला तिच्या तालावर नाचवते हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *