http_o.aolcdn.comhssstoragemidas5ce29d151b00b0e7078fcb5f783a1eea204849461523699180

महापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई

गोवंडीत महापालिका शाळेत औषधातून विषबाधा झाल्यामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदनी साहिल शेख असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.महापालिकेच्या या शाळेत दिल्या गेलेल्या लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सोमवारी शाळेत विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्या. काही मुलांना तर रक्ताच्या उलट्या होवू लागल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. यापैंकी एका मुलीचा मृत्यू झालाय. तर आता ७६ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *