nilesh rane kopardi

त्या शूर मावळ्यांचा निलेश राणे यांच्या हस्ते भव्यदिव्य सत्कार

अग्रलेख महाराष्ट्र

चिपळूण (✍🏻कुमार चव्हाण ) :

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांवर भर कोर्टात हल्ला करणाऱ्या बाबूराव वाळेकर, राजेंद्र जऱ्हाड, अमोल खुणे, गणेश खुणे या चार शिवबा संघटनेच्या मावळ्यांचा भव्यदिव्य कौतुक सोहळा दि. ८ आॅगस्ट रोजी पराडा (ता. आंबड, जि. जालना) येथे पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खा. निलेश राणे होते. यावेळी या चार शूर मावळ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी खा. श्री. राणे म्हणाले की, हे चार शूर मावळे अख्ख्या महाराष्ट्राला समजावेत म्हणून हा सत्कार सोहळा घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोपर्डी बलात्कार प्रकरण गाजले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र्रात मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले. या प्रकरणातील संशयितांना अटक करून न्यायालयात नेत असतानाच न्यायालयाच्या आवारातच शिवबा संघटनेच्या बाबूराव वाळेकर, राजेंद्र जऱ्हाड, अमोल खुणे, गणेश खुणे या चार मावळ्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा या चार मावळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही निलेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. तेव्हा निलेश राणे यांनी ज्येष्ठ वकील हर्षद निबांळकर यांना विनंती केली व न्यायालयीन लढाईसाठी जो काही खर्च येईल तो करण्याची तयार माजी खा. निलेश राणे यांनी दाखविली होती. औरंगाबाद हायकोर्टाने त्या चार मावळ्यांना जामिन मंजूर केला. तेव्हा माजी खा. निलेश राणे यांनी दिलेल्या आधाराने या तरुणांचे कुटुंब भारावून गेले. तेव्हा या शिवबा संघटनेच्या चार शूर मावळ्यांनी श्री. राणे व अ‍ॅड. निंबाळकर यांचे आभार मानले.
श्री. राणे म्हणाले की, मी सदैव सुखदु:खात समाजाबरोबर असेन. मी कोणत्याच मराठा तरुणाला उघड्यावर पडू देणार नाही. मी आधी समाजाचा मग बाकीचे, कोपर्डी प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न करणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मी समाजाबरोबर असणार आहे आणि जर मराठा समाज व महिलांवर कोणी अन्याय करीत असेल तर यापुढे शिवबा संघटना अन्यायाविरुध्द जे जे करेल त्या त्या वेळेस खंबीरपणे तुमच्या पाठीशी मी उभा असेन. कोपर्डी नराधमांवर हल्ला करणाऱ्या त्या चार शुर मावळ्यांच्या पाठिशी मी ठामपणे कायम उभा राहिन, अशी ग्वाही मराठा हृदयसम्राट निलेश राणे यांनी दिली. कोणीही शंका बाळगण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत समाजासोबत असेन, मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण कोणत्याच प्रश्नावर मागे हटणार नाही. मी शिवबा संघटनेच्या चार भावांना न्याय दिला आणि यापुढेही मी समाजाच्या प्रश्नासाठी संघर्ष करण्यास तयार आहे. राज्य सरकारने तात्काळ आरक्षण द्यावे नाहीतर जो काही राज्यात परिणाम होईल त्यास सरकार जबाबदार असेल आणि मी मात्र त्यावेळेस समाजाबरोबरच असेन. मराठा क्रांतीमोर्चा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत, असा थेट इशारा माजी खा. निलेश राणे यांनी दिला.

nilesh rane kopardi2
यावेळी या सोहळ्याला मॉँसाहेब जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव, शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जरांगेपाटील, सुनील काटेकर, विजय काकडे, किशोर चव्हाण, गंगाधर काळकुटे, सुनील काटेकर, शैलेश पवार, पवन गडगुळ, रामा गोल्डे, किशोर साळुंखे, प्रदेशाध्यक्ष गणेश शिंदे, जिल्हाध्यक्ष रामजी गोल्डे, रवि राऊत, जालना नगर उपाध्यक्ष राजेश राऊत, शिवबा संघटना तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील जऱ्हाड, परांडा सरपंच वसंत पाटील, चत्रभूज माळोदे, पांडुरंग नाडकर, सिध्दुसिंह जऱ्हाड, गणा पाटील, शिवा पाटील, प्रकाश जऱ्हाड, दत्ता पाटील, विकास रणदिवे, मुकुंदा कान्हे, रणजीत कान्हे, अमोल ठुले, अतुल ठुले, सोमनाथ कोल्हे, सिध्देश्वर धुपे, श्याम पा. हरिश्चंद्रे, गजानन देठे, दत्ता देठे, राहुल गवारे, उदय देठे, विजय देठे आदी शिवबा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार शाम पाटील यांनी मानले.

invitation inner page

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *