Narayan Rane

यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे प्रमुख पाहुणे

महाराष्ट्र मुंबई शिक्षण

मुंबई – युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने गतवर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक – अध्यक्ष, खासदार श्री. नारायण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

देशातील तरुणांनी केंद्रीय नागरी सेवा, उच्च शिक्षण, व्यवसाय या क्षेत्रात आपले करिअर करून देशाला आणि महाराष्ट्राला सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत केले पाहिजे यासाठी श्री. नारायण राणे हे नेहमी आपल्या भाषणांतून तरुणांना प्रोत्साहित करत असतात.

सदर सत्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी सायं.४. ३० वाजता मुंबई – प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे.

युवा उत्थान फाऊंडेशन ही संस्था युवकांनी एकत्र येऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याकरिता स्थापन केली आहे.

invitation inner page

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *