DkHwW20WwAAGy7V

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

मुंबई

जम्मू-काश्मीरमधील गुरेज भागात दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं आहे. आज मीरा रोड येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी नागरीकांनी घराबाहेर गर्दी करायला सुरूवात केली आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय लष्कराच्या चार जणांना वीरमरण आले. यात मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले. मेजर राणे हे मुंबईतील मीरा रोड येथील रहिवासी होते.मंगळवारी सकाळी ते दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाल्याची बातमी धडकली आणि शीतलनगर भागात एकच शोककळा पसरली. कौस्तुभ राणे यांना नियंत्रण रेषेवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सेना शौर्यपदकाचा बहुमान मिळाला होता आणि मेजर या हुद्दय़ावर त्यांना बढतीही मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याविषयी रहिवाशांच्या मनात प्रचंड अभिमान होता. मात्र त्यांच्या बलिदानानंतर मीरा रोडचा सुपुत्र गेल्याचे दु:ख या परिसरावर दाटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *