evm-machine

आगामी सार्वत्रिक निडणुका ईव्हीएमद्वारेच – मुख्य निवडणूक आयुक्त

देश

‘ईव्हीएम’बद्दल शंका घेतल्या जात आहेत, परंतु मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याचे फार चांगले परिणाम नाहीत. मतपत्रिकेने मतदान घेतल्याने लाखो मते अवैध ठरतात. यामुळे अत्यल्प मताधिक्क्याने उमेदवार विजयी होतात. अशाप्रकारे निवडून आलेले उमेदवार लोकांच्या आशा-आकांक्षावर खरे उतरण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित सर्व घटकांचे ई व्हीएम बाबतचे मत जाणून घेऊन, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. असे सांगून भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी आगामी सार्वत्रिक निडणुका ईव्हीएमद्वारेच घेण्याचे संकेत दिले.
राजेंद्र माथूर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करणे अशक्य आहे. यंत्र निकामी होऊ शकते, परंतु ते प्रमाण केवळ ०.५ टक्के आहे, याकडेही रावत यांनी लक्ष वेधले. मतदारांना त्यांचे मत नेमके कुणाला मिळाले, हे समजण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला जात आहे. आगामी निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट तयार करण्याचे काम सुरू आहे. आगामी निवडणुका मतपत्रिकेद्वारा घेण्यात याव्यात म्हणून काही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला निवेदन देणार असल्याचे वृत्तपत्रातून समजले. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यास, त्यांना वेळ दिला जाईल. त्यांच्या शंकांचे समाधान केले जाईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याबाबत केवळ चर्चा सुरू आहे. त्यासाठी कायदा करावा लागेल. ही बाब निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील नाही, असे रावत यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *