24_07_2018-morcha1_18235125

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक

महाराष्ट्र

सकल मराठा समाजातर्फे ९ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.मात्र या बंदमध्ये मुंबई आणि ठाण्याचा समावेश नसणार आहे. यासोबत परळीलाही वगळण्यात आलं आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात ९ ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांची आज (बुधवार) सकाळी एक बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीतील निर्णयानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच परळी या चार शहरांना उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्यानंतर या एकमदताने या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चारही शहरांना बंद मधून वगळण्यात आले असले तरी या शहरांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा आंदोलन समन्वय समितीने घेतला आहे.
राज्यात गेल्या २१ दिवसांपासून ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *