ghatkoper

घाटकोपर बॉम्बस्फोट : फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक

महाराष्ट्र मुंबई

2002मध्ये झालेल्या मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपीला अखेर औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएस पथकाकडून ही अटक करण्यात आली आहे. घाटकोपर बॉम्बस्फोटात अब्दुल रहमान शेख हा आरोपी फरार होता. पोलीस त्याचा कसून तपास करत होती. अखरे त्याच्या मुसक्या आवळण्य़ात गुजरात एटीएस पथकाला यश आलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, याह्या अब्दुल रहमान शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आजारी पत्नीला भेटण्यासाठी तो औरंगाबादमध्ये येणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती, त्यानुसार स्थानिक एटीएसच्या मदतीने सापळा रचून एका खासगी रुग्णालयातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. गुजरात एटीएसचे पथक त्याला मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात देणार असल्याचं समजतंय.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *