chembur-blast-670x443

चेंबूर येथिल बीपीसीएल कंपनी मध्ये स्फोट

मुंबई

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांन्टमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरलं आहे. चार ते पाच कामगार या स्फोटात जखमी झाले असून आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती आहे. काही किलोमीटरचा परिसर या स्फोटाने हादरला त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. अग्निशमन दलाच्या पंधरा गाडया आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुपारी तीन वाजता हा स्फोट झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली.

बीपीसीएलचा अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. खबरदारी म्हणून या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. माहुलमध्ये भारत पेट्रोलियमचे मोठे रिफायनरी प्लांन्टस आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *