299729-671662-mirabai-chanu-970-pti

मीराबाई चानूची आशियाई स्पर्धेतून माघार

क्रीडा

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेली भारताची वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आगामी आशियाई स्पर्धेतुन माघार घेतली आहे. पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे नसावरल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे.भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे सचिव सहदेव यादव यांनी याबाबत माहिती दिली.
चानूने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे. मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त केली होती. तिने जकार्ता स्पर्धेतूनमाघार घ्यावी आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आशियाई स्पर्धेला काही दिवसच शिल्लक आहेत. अशा स्थितीतपाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या मीराबाईने जड वजन उचलणे योग्य नाही. त्याचा परिणाम तिच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर होऊ शकतो आणि अखेर आशियाई स्पर्धांपेक्षाऑलिम्पिक स्पर्धा अधिक महत्त्वाची आहे’, असेही शर्मा म्हणाले.
मूळची मणिपूरच्या असलेल्या या २३ वर्षीय खेळाडूनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वर्गात १९४ किलो वजन उचलून सुवर्ण पदक आपल्या नावावर नोंदवलं होतं. तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्येही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत १९६ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं होतं. हा एक राष्ट्रीय रेकॉर्डदेखील आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *