180327-spain-captures-hacking-gang-feature

दारुच्या नशेत रेल्वे स्थानकावरील बेंच ट्रॅकवर फेकले

मुंबई

दारुच्या नशेत तर्राट असलेल्या एका तरुणाने ऐरोली स्थानकात सिगारेट मिळाली नाही म्हणून प्लॅटफॉर्मवरील बेंच ट्रॅकवर टाकल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. सुदैवाने रात्री उशीरा लोकलसेवा बंद असताना हा प्रकार घडल्याने मोठा अपघात टळला.ऐरोली येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला हा तरुण त्याच्या मित्रांसोबत एका वाढदिवसाला गेला होता. तिथे त्यांनी भरपूर दारू ढोसली होती. पार्टीतून निघाल्यानंतर त्या तरुणाला व त्याच्या मित्रांना सिगारेट ओढण्याची तल्लफ आली. मात्र रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती. सिगारेट शोधत शोधत ते ऐरोली स्थानकात आले. मात्र तेथेही सिगारेट न मिळाल्याने त्या तरुणाने स्थानकात पोलिसांना बसण्यासाठी ठेवलेला बेंच ट्रॅकवर टाकला. तो आवाज ऐकून स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला अटक केली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *