photo-1486312338219-ce68d2c6f44d

माहितीचा अधिकार,आता ऑनलाइनअर्ज करता येणार

मुंबई

गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेची विविध कामे, प्रकल्प, नागरी सुविधा, तसेच अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी मोठय़ा संख्येने माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत पालिकेकडे अर्ज करण्यात येत आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये विविध कामांविषयी माहिती मिळविण्यासाठी पालिकेच्या दफ्तरी माहितीचा अधिकार कायद्याखाली मोठय़ा संख्येने अर्ज येऊ लागले आहेत. ही बाब विचारात घेऊन पालिका प्रशासनाने माहितीच्या अधिकाराच्या अर्जासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांना माहिती मिळविण्यासाठी ऑनलाइनवर अर्ज करता येतील.
या अर्जाची छाननी, संबंधित विभागाकडून माहिती गोळा करणे आणि माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांला ती उपलब्ध करणे यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बराच वेळ खर्च होतो. माहितीचा अधिकार कार्यकर्ते ही माहिती मिळवून त्याचे काय करतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माहितीच्या अधिकारात घेण्यात येणाऱ्या माहितीचा गैरवापर होत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी यापूर्वी केला होता. काही कार्यकर्ते माहितीच्या अधिकारात माहिती मिळवतात आणि त्याच्या आधारावर तक्रार करतात. मात्र अचानक तक्रार मागेही घेत असल्याचे आढळून आले आहे. माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी पालिकेने एक संकेतस्थळ तयार करून त्यावर माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज स्वीकारावे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *