d273645aae4f414ca77c0905d215fec0

मुलुंड फार्मसी कार्यालयात चेंगराचेंगरी

मुंबई

मुलुंड पश्चिमेला फार्मसी कार्यालय आहे. या कार्यालयात ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी केली जाते. शुक्रवारी देखील ऑफलाइन नोंदणीसाठी कार्यालयाबाहेर गर्दी झाली होती. सकाळी साडे नऊला कार्यालय सुरु होते. कार्यालयाबाहेर लोकं रांगेत असताना दहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसात कागदपत्रे भिजू नये, यासाठी तिथे धावपळ सुरु झाली. यातूनच चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर फोर्टीस तर अन्य तिघांवर अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *