mulk-nt_5b606aae69de2

मुल्क’आज प्रदर्शित

मनोरंजन

अनुभव सिन्हा यांचा ‘मुल्क’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. ऋषी कपुर, तापसी पन्नू, प्रतीक बब्बर, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट दहशतवादाच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची कथा आहे.वाराणसीमधील एका सामान्य मुस्लीम कुटुंबात वाढलेल्या शाहिदवर एका प्रकरणामुळे दहशतवादी हा ठप्पा बसतो. ज्याची झळ संपूर्ण कुटुंबाला लागते. रोज हिंदू कुटुंबांच्या सानिध्यात राहणाऱ्या या मुस्लीम कुटुंबाकडे क्षणार्थात सारं वाराणसी दहशतवादी म्हणून पाहू लागतं. इथूनच सुरु होतो या कुटुंबाचा समाजाबरोबरचा लढा. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती दहशतवादी नसतो. त्या मुस्लीम व्यक्तीचंही त्या राष्ट्रावर तेवढंच प्रेम असतं जेवढे त्या राष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं असतं.
अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाला योग्य दिशा दाखविली असून त्यांनी दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरित्या पार पडली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कुठेही जातीयवाद निर्माण होईल किंवा एखाद्या धर्मावर टीका होईल असं चित्रीत करण्यात आलेलं नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *