nilesh rane marath arakshan

समाजासाठी काही पण..

अग्रलेख महाराष्ट्र

संतोष कांगणे

काल मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी समन्यवयक , राजकारणी , विचारवंत , संशोधक , कलाकार ह्या सर्वांना मराठा आरक्षणवार चर्चा करण्यासाठी व सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सह्याद्री अतिथी गृहावर चर्चा आयोजित केली होती.

हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक त्या चर्चासत्राला उपस्तित होते. याचा अर्थ काय समजायचा ? हातावर मोजण्या इतक्याच लोकाना आरक्षण हवे आहे का ? की मराठा समाजाचा रोष ओढावून घ्यायला नको आणि स्वताच्या खुर्चीची काळजी म्हणून कोणीही जायला तयार झाले नाही. जर आपण गेलो तर मला निवडणुकीत जिंकून येणे कठीन होईल हीच भीती प्रत्येकाच्या मनात होती.

हाच फरक आहे माननीय श्री .नारायण राणे , श्री. निलेश राणे ,श्री.नितेश राणे आणि इतर राजकरण्यांमधे …. माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हे तिघेही झपाटल्यासारखे काम करत आहेत.

nitesh rane maratha arakshan

समाजातील मराठा बांधव जेव्हा रस्त्यावर उतरला होता. आत्महत्या करत होता. तेंव्हा स्व:ताच्या खुर्चीचा विचार न करता त्यानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चर्चा केली मार्गर्शन केले. आणि त्यानंतर इतर पक्षांनी त्यांच्या त्यांचात बैठका घेतल्या पण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैरहजर . एकीकडे मा.आमदार श्री. नीतेशजी राणे नवी मुंबई , ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत आणि मराठा बांधवांवर कोणतीही चुकीच्या केसेस पडु नये म्हणून काळजी घेत आहेत तर दुसरीकडे मा.श्री.निलेशजी राणे कोकणात आपल्या मराठा बांधवांसोबत रस्त्यावर उतरले आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत .
आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच हे फक्त बोलून न दाखवता त्या लढाई मधे स्व:ताला वाहून घेऊन कार्य करणाऱ्या राणे कुटुंबाला माझा सलाम.

 

Namkeen

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *