jammu-kashmir-2-terrorist-killed-in-sopore-encounter-thepoliticalindia

जम्मू-काश्मीर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

देश

जम्मू-काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. येथील दुर्सू या गावात हे दोघे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. सोपोर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी फायरिंग झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आहे. यापूर्वी कुपवाडामध्ये गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यातही दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *