images

लखनौ मुसळधार पाऊसात चार इमारती जमीनदोस्त,तिघांचा मृत्यू

देश

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे चार इमारती कोसळल्या असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. लखनौच्या गणेशगंज, अमीनाबाद, हुसैनाबाद आणि उदयगंज या भागात ४ इमारती कोसळल्या असून अनेक जण जखमी झाले आहेत. अमीनागंजमध्ये एकाचा मृत्यू झाला असून हुसैनाबादमध्ये दोघांचा मृत्यू ओढवला आहे. लखनौमध्ये सकाळपासून पाऊस सुरू असल्याने गणेशगंज मध्ये एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर आहेत.
उत्तर प्रदेशच्या बहुतांश जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तांसात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *