2017_5$largeimg12_Friday_2017_232415022

सांगली-जळगावमध्ये मतमोजणीला सुरुवात

महाराष्ट्र

सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. सांगलीत ७८ जागांसाठी ६२.१७ टक्के मतदान झालं. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे. तर जळगावात कमळ फुलण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी ५५.७२ टक्के मतदान झालं. जळगावात मुख्य लढत भाजप आणि शिवसेनेत होत आहे. या निवडणुकीत भाजपला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील, अशी शक्यता आहे.

Updates :

जळगाव ः प्रभाग १९ मध्ये सर्व ३ जागांवर शिवसेना विजयी, १९ ‘अ’ लता सोनवणे (आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा पत्नी), १९ ‘ब’ मध्ये गणेश सोनवणे तर १९ ‘क’मध्ये जिजाबाई भापसे विजयी
सांगली : भाजपा ५ जागांवर तर आघाडी १० (काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४ जागा) जागांवर पुढे

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *