74779

‘अॅपल’ कंपनी बनली जगातील १७७ देशांपेक्षाही श्रीमंत

व्यापार

प्रसिद्ध मोबाईल ब्रॅन्ड आयफोन बनवणारी अॅपल कंपनी ही १ ट्रिलिअन डॉलर उलाढाल असलेली पहिली अमेरिकन लिस्टेड कंपनी बनली आहे. या एकट्या कंपनीचे उत्पन्न हे जगभरातील १७७ देशांच्या उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ६८,६२० अब्ज रुपये इतकी आहे. यावरुन हे स्पष्ट हेते की, अॅपल कंपनीची उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेच्या ३८ टक्के हिश्याऐवढी आहे. कारण, नुकताच भारताचा जीडीपी २.६ ट्रिलिअन डॉलर इतका नोंदवला गेला आहे.
वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, जगातील १९३ देशांपैकी केवळ १६ देशच असे आहेत ज्यांचा जीडीपी हा अॅपलच्या बाजारमुल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच १७७ देशांपेक्षा श्रीमंत अॅपल कंपनी आहे. सध्या अॅपलची बाजार मुल्य हे इंडोनेशियाच्या जीडीपीबरोबर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *