snake

मुंबईत लोकलमध्ये साप, प्रवाशांमध्ये गोंधळ

मुंबई

टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये साप आढळल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे लोकलमधल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळाचं वातावरण झालं होतं.
ठाणे स्थानकात लोकल आल्यानंतर एका प्रवाशाला लोकलच्या पंख्यात साप असल्याचे आढळून आले आणि डब्यात गोंधळ उडाला. ठाणे स्थानकात काही वेळ लोकल थांबवण्यात आली होती. एक लोकल थांबल्यामुळे पाठीमागे असलेल्या अनेक लोकल गाड्याही लटकल्या आणि मध्य रेल्वे आज नव्या कारणामुळे पुन्हा खोळंबली.
टिटवाळाहून सीएसएमटीला सकाळी ८.३३ च्या लोकलमध्ये हा प्रकार घडला. ठाणे स्थानकात प्रवाशाला हा साप दिसल्यानंतर साखळी खेचून लोकल थांबवण्यात आली होती. प्रवाशांनी खबरदारी म्हणून डब्यातील पंखे आणि दिवे बंद केले. रेल्वे अधिकार्‍यांनी अखेर डब्यातील सापाला बाहेर काढल्यानंतर लोकल पुन्हा रवाना झाली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *