Nilesh Rane

शिवसेनेने २२ वर्षे जिल्ह्याला केवळ फसवले : निलेश राणे

महाराष्ट्र

रत्नागिरी : तुम्ही २२ वर्षे शिवसेनेला संधी दिलीत, आता तर आमदार, खासदार, पालकमंत्री त्यांचेच आहेत. तरीही इथला आंबा बागायदार,मच्छीमार, व्यापारी, एस.टी. कामगार, सामान्य माणूस, समाजाचा प्रत्येक वर्ग आज दु:खी आहे, कारण त्यांच्यासाठी बोलणारा आवाज आज सभागृहात नाही. इथल्या नेत्यांनी स्वत:ला सुंदर केलं पण आपला जिल्हा सुंदर दिसण्यासाठी इतक्या वर्षात काहीच केलं नाही. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा सर्वार्थाने विकासात पुढे असताना रत्नागिरी मात्र खुपच मागे आहे. म्हणूनच रत्नागिरीची चिंता वाटते. हा जिल्हा, जिल्हावासीय म्हणजे माझं कुटूंब आहे, त्याच्या उन्नतीसाठी आजही मी इथे कार्यरत आहे. इतकी वर्षे शिवसेनेवर विश्वास दाखविलात, त्यांनी तुमची फसवणूक केली, आता एक संधी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला द्या, पाच वर्षात जिल्ह्णाचं रूप बदलतो असा शब्द माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हावासीयांना दिला.
देऊ तो शब्द खरा करू हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा रत्नागिरीमध्ये पहिला मेळावा माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी पार पडला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेच्या कार्यपध्दतीवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले केवळ रत्नागिरीमध्येच शिवसेना जास्त आहे. गेली २२ वर्षे तुम्ही सेनेवर विश्वास दाखविलात पण त्या सेनेने तुम्हाला काय दिलं? २०१४ मध्ये सत्तेत जाऊन बसले, मंत्रीपदे, पालकमंत्रीपद घेतले पण त्या बदल्यात जिल्ह्णाचा विकास किती केला? कारखाने, आरोग्य सुविधा, रस्ते, रोजगार यातलं या पक्षाने तुम्हाला काय दिलं असा सवाल करताना निलेश राणे म्हणाले इथल्या आमदाराचे वडिल जिल्ह्णातले मोठे कॉन्ट्रॅक्टर पण आमदाराने स्वत: सुंदर दिसण्यासाठी पैसे खर्च केले, रत्नागिरी चांगली दिसावी यासाठी त्याने काय केलं? आज नजिकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्णाचे दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर आणि रत्नागिरी २२ व्या क्रमांकावर आहे. हे चित्र बदलावं, रत्नागिरीनेही विकासाच्या दृष्टीने वाटचाल करावी यासाठी खासदार झाल्यापासून प्रयत्न केले. खासदारकीच्या काळात वृत्तपत्रांमध्ये कमी दिसलो असेन पण मतदार संघातील प्रत्येक वाडीवस्तीत पोहोचण्याचा प्रयत्न केला, येणारा निधी सर्वात आधी मतदार संघात वितरीत केला. तेव्हा कुठल्याही अधिकाऱ्याचा त्रास तुम्हाला नव्हता पण आज आंबा बागायतदार, चिरेखाण, निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या संघटनांना कळतंय आपला माणूस सभागृहात नसेल तर कुठलेही प्रश्न मार्गी लागू शकत नाही. ज्यांनी बाजू मांडू असे आश्वासन दिले तेच आज इथले मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पण ते सगळेच फक्त त्यांचा विचार करतात, त्यांना जनतेचं हिताचं काहीही पडलेलं नाही. याची जाणीव सुरूवातीपासूनच पालकमंत्री रवींद्र वायकरांसोबत असलेल्या अशोक वालमना झाली, नाणार आणून या भूमीचं, जनतेचं नुकसान करण्याचा शिवसेनेचा डाव त्याच्या लक्षात आला, म्हणूनच अशोक वालम सेनेच्या विरोधात उभे राहिले. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पावरून माझ्याविरूध्द लोकसभेच्या निवडणुकीत रान उठविणाऱ्या विनायक राऊत, राजन साळवी सत्ता आल्यानंतर १०० दिवसात जैतापूर रद्द करणार होते, पण आज जैतापूरचे काम सुरूच आहे, टर्बाईन झाले, भिंती, अंतर्गत रस्ते उभे राहिले आहेत हा विरोधाभास निलेश राणे यांनी उपस्थितांसमोर मांडला. शिवसेनेचा हा खोटेपणा, दिखावूपणा जनतेसमोर उघड होतोय, म्हणूनच आज लोक, विविध संघटना पुन्हा राणे साहेबांकडे येतेय, तेच आपले प्रश्न सोडवतील हा विश्वास त्यांना आहे. नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करेपर्यंत शिवसेनेने केवळ इथे बघ्याचीच भूमिका घेतली होती पण आताही प्रकल्पाच्या विरोधात उतरणाऱ्या शिवसेनेच्याच सरंपच, पदाधिकाऱ्यांनी जमिनीची दलाली केली आहे, नाणरला शिवसेना आणि उध्दव ठाकरेंचा विरोध हा केवळ दिखावूपणा आहे, पण त्यांनी काहीही केले तरीही नाणार जाणार हे अटळ सत्य आहे अशी ग्वाही निलेश राणेंनी रत्नागिरीकरांना दिली.
राणे साहेबांबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची उत्सूकता आज संपूर्ण राज्यात आहे, त्यांच्याच नावावर मिडीयामध्ये हेडलाईन येतात, नाणार असो किंवा मराठा आरक्षण असो आजही नारायण राणे यांच्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत. आपल्या माणसाची ही ताकद आहे, त्याच ताकदीवर इथला विकास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू इच्छीतो आहोत. याचसाठी २०१४ नंतरही मी सातत्याने प्रयत्न करतोय, कष्ट घेतोय. इथला केवळ मराठा समाजच नव्हे तर प्रत्येक समाज माझ्याजवळचा आहे. रत्नागिरी केवळ मतदारसंघ नाही तर माझे कुटूंब आहे, माझ्या पराभवानंतरही इथल्या माणसांनी माझ्यावर निरपेक्ष प्रेम केलं आहे, तिच माझी माणसं, माझे कार्यकर्ते माझं सैन्य आहे. त्या सैन्यालासोबत घेऊन मी या जनतेच्या विकासासाठी सदैव कटीबध्द आहे. इथल्या जनतेने २२ वर्षे सेनेवर अखंड विश्वास ठेवला, आता फक्त पाच वर्षे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षावर विश्वास ठेवा, आम्ही विकासाचं नवं पर्व मी इथे सुरू अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

2

 

 

 

 

 

 

nilesh rane

 

 

 

 

 

 

 

… तरीही अजित पवार निवडून आले!
गेल्या निवडणकीमध्ये अजित पवार यांनी धरणांबाबत वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर राज्यभर टीका झाली. त्यांच्या वक्त्व्याचा निषेध केला. परंतु तरीही अजित पवार आपल्या मतदार संघामध्ये ९० हजार मतांनी निवडून आले. कारण तिथल्या मतदाराला माहित आहे, आपला माणूस चुकला तरीही तो आपल्यासाठी कष्ट घेणाार आहे, आपल्याच विकासासाठी प्रयत्न करणार आहे, म्हणूनच त्याला मोठा केला पाहिजे. आजही मी पराभवानंतरीही सातत्याने तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, पण तुमचे प्रश्न बाहेर मांडून उपयोग नाही, त्यासाठी सभागृहाचे व्यासपीठ हवे, ती ताकद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून मला द्या असे आवाहन निलेश राणे यांनी यावेळी केले.

पवार साहेबांनाही करावा लागतो राणे साहेबांना फोन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधताना निलेश राणे म्हणाले गेली ५० वर्षे राणे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. प्रत्येक पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांच्याबद्दल राज्यातील प्रत्येक भागात आकर्षण, उत्सूकता आहे. प्रत्येकजण त्यांच्याजवळ जाण्याचा, बोलण्याचा, त्यांना स्पर्श प्रयत्न करतो. तोच अभिमान समजतो. महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या प्रश्नांच्यावेळी मिडियालाही राणे साहेबांची भूमिका महत्त्वाची वाटते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत बोलायला पवार साहेबांना राणे साहेबांनाच करावा लागतो,यावरूनच तुमच्या नेत्याची ताकद ओळखा, त्यांनी तुमच्यासाठी हा पक्ष स्थापन केला आहे, त्यांचे हात बळकट करा, तुमच्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन येईल.

 

Namkeen

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *