iecqfmfs_ashwin-reuters_625x300_02_August_18

England vs India 1st Test – इंग्लंडचा डाव 287 धावांत सर्वबाद

क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 287 धावा केल्या आहेत.
गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. इंग्लंडने बुधवारी पहिल्या दिवसाखेर 9 बाद 285 धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 2 धावा जोडता आल्या.
इंग्लंडकडून या डावात कर्णधार जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतक केले. रुटने या डावात 156 चेंडूत 9 चौकारांच्या सहाय्याने 80 धावा केल्या. तर बेअरस्टोने 88 चेंडूत 70 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार मारले.
इंग्लंडच्या अन्य फलंदाजांपैकी फक्त केटन जेनिंग्जने थोडीफार रुटला साथ दिली. मात्र तोही 42 धावांवर असताना बाद झाला. अन्य फलंदाजांपैकी अॅलिस्टर कूक(13), डेव्हिड मलानही(8), बेन स्टोक्स(21), आदिल रशीद(13),स्टुअर्ट ब्रॉड(1), सॅम करन(24) आणि जेम्स अँडरसन(2*) यांनी धावा केल्या. तर जॉस बटलर शून्यावर बाद झाला.
भारताकडून या डावात आर अश्विनने 62 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी मोहम्मद शमी(3/64), उमेश यादव (1/56) आणि इशांत शर्मा(1/46) यांनी विकेट घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *