Amitabh-bachchan-647x330

बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म

मनोरंजन

बिग बी अमिताभ बच्चन आजच्या दिवसाला अर्थात २ ऑगस्टला पुनर्जन्मचं मानतात कारण मृत्यूच्या दारातून अमिताभ बच्चन परतल्याच्या या घटनेला आज ३६ वर्षे पुर्ण झाली.कुली चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी मारामारीच्या दृश्यादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. केवळ चाहत्यांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मी जिवंत आहे अशी भावना व्यक्त करत ट्विटरवरुन चाहत्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे ऋण मी फेडू शकणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे .
जुलै १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटातील एक साहस दृश्य करताना अभिनेता अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर बंगळुरुमध्ये उपचार करण्यात येत होते. दरम्यान, त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुगालयात हलवण्यात आलं होतं. ही आठवण ताजी करत बिग बी यांनी ट्विट केलं आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *