a-552

२७ वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

महाराष्ट्र

नालासोपाऱ्यात ही घटना घडली आहे. महिलेने आपल्या २७ वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. मुलगा दारुसाठी पैसे मिळावेत यासाठी वारंवार महिलेला त्रास देत होता. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने त्याची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आपली आई जया आणि वडिल बलराम यांच्यासोबत राहत होता. त्याला दारुचं प्रचंड व्यसन होतं. संतोष हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. संतोषची पत्नी त्याला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी आपल्या नवजात बाळासोबत घर सोडून निघून गेली होती.संतोषची आई जया घरकाम करायची. तो तिला पैशांसाठी नेहमी त्रास देत असे. जया यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९ वाजता संतोषने दारुसाठी पैसे मिळावेत यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी नकार दिल्यानंतर संतोष कुऱ्हाड घेऊन अंगावर धावत आला. यावेळी जया यांनी कुऱ्हाड त्याच्या हातातून खेचून घेत त्याच्यावर वार केले. संतोष याचा तेथेच मृत्यू झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *