sana-bihara

११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सनाची सुखरूप सुटका

देश

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये ११० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या सनाला ३० तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आणि लष्कराच्या जवानांनी तीन वर्षांच्या या चिमुकलीला अथक बचाव कार्यानंतर सुखरूपपणे बाहेर काढले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. सनाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिच्या आईने सर्वांचे आभार मानले. बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.११० फूट खोल बोअरवेलमध्ये ती साधारण ४३ फूटांवर अडकली होती. बचावपथकाने त्या बोअरवेलच्या समांतर खड्डा खोदून सनाची सुटका केली. सिलेंडर आणि पाइपच्या सहाय्याने तिच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जात होता, तसंच कॅमेऱ्याद्वारे तिच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. मात्र, मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. जसजसा वेळ जात होता तसतशी सर्वांची चिंता वाढत होती. अखेर 31 तासांच्या बचाव कार्यानंतर एनडीआरएफचे पथक या चिमुकलीपर्यंत पोहोचले. मुंगेर शहरामध्ये भर वस्तीत असणाऱ्या बोअरवेलमध्ये ही मुलगी काल संध्याकाळच्या सुमारास पडली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *