dn7sql95a3r_whatsapp-logo-reuters_625x300

तुम्हालाही असा मॅसेज आला असेल तर सावध राहा !

व्यापार

व्हॉटसअपवर’इन्कम टॅक्स भरल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत. पैसे किती आलेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असा मॅसेज आल्यानंतर तुम्ही या लिंकवर क्लिक करू नका.
व्हॉटसअपवर ‘इन्कम टॅक्स भरल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत. पैसे किती आलेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर सावध राहा.कारण या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन हॅक होण्याचा धोका आहे.
लोकांना मूर्ख बनवून, त्यांचा डाटा चोरून खिसा रिकामा करणं हा चोरांचा नवीन फंडा यशस्वी करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. लोकांना फसवण्यासाठी ही आणखीन एक नवी युक्ती शोधून काढण्यात आली आहे.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमधील डाटा लिक होण्याचा धोका आहे. लक्षात ठेवा, आयकर विभागाकडून अशा प्रकारे कोणताही मॅसेज पाठवला जात नाही… किंवा पैसे जमा झाल्याचाही मॅसेज मिळत नाही… त्यामुळे, व्हॉटसअप, ईमेल किंवा सोशल मीडियावर अशा प्रकारचे मॅसेज ते तत्काळ डीलिट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *