मुंबई – गतवर्षी प्रमाणे याही वर्षी युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. सदर सत्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी सायं.४. ३० वाजता मुंबई – प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे.
युवा उत्थान फाऊंडेशन ही संस्था युवकांनी एकत्र येऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याकरिता स्थापन केली आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थी अधिकाधिक संख्येने प्रशासनात यावेत व त्यांनी देशाच्या प्रशासनाचे नेतृत्व करावे असा युवा उत्थान फाऊंडेशनचा मानस आहे.
यूपीएससी यशस्वी उमेदवारांनी खडतर व प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेले हे यश समाजासमोर आदर्श आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशातून प्रेरणा घ्यावी , याच स्तुत्य हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष श्री.अमोल गवळी यांनी एसएनपी न्यूज सोबत बोलताना आपले विचार मांडले.