Train

धावत्या लोकल ट्रेनमध्ये दुसऱ्यांच्या जीवावर बेतणारे स्टंट

मुंबई

मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनमधील स्टंटबाजी हा आता काही नवीन विषय राहिला नाही. त्यातही हार्बर मार्गावर अशी स्टंटबाजीचे प्रकार वरचेवर होताना दिसतात. अशाच एका स्टंटबाजीची घटना रविवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास हार्बर मार्गवरील जीटीबी स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारे टवाळखोर नक्की कोण आहेत याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडीओ स्टंट करणाऱ्यांपैकीच एकाने सेल्फी कॅमेराने शूट केलेला दिसत असून चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत आहे. तर इतरजण दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.या हुल्लडबाजांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावल्याचेही या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओमध्ये जीटीबी स्थानकात या चौघांपैकी एकजण उतरलेला दिसतो. तसेच ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील हा तरुण धावू लागतो. त्याच वेळी त्याच्या टोळीतील एकजण दरवाजाला लटकून बाहेर झेपावत प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतो. हा संपूर्ण घटनाक्रमही या व्हिडीओत कैद झाला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *