aadhar-card

आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका : UIDAI

देश

आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय (Trai) चे चेअरमन आर एस शर्मा यांच्या अंगलट आल्यानंतर UIDAI ला जाग आली आहे. कारण, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर सार्वजनिक करु नका, असं आवाहन UIDAI कडून करण्यात आलं आहे.
UIDAI कडून नागरिकांनी आपला १२ अंकी आधार क्रमांक इंटरनेट किंवा सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला देण्यात आला आहे. आधारक्रमांक शेअर करणं चुकीचं आहे, असं करणं कायदेशीरही नाहीये. नागरिकांनी स्वतःही आधार क्रमांक शेअर करु नका आणि इतरांनाही करु देऊ नका. याशिवाय आधार क्रमांकाबाबत कुणाला चॅलेंजही करु नका असं UIDAI ने म्हटलं आहे.
या सर्व प्रकरणाची सुरूवात दोन दिवसांपूर्वी आर एस शर्मा यांनी आधार क्रमांक (Aadhaar number) सार्वजनिक केल्यानंतर झाली. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही किंवा माहिती हॅक करता येत नाही, असा दावा केला होता. आपल्याला यामुळे कोणतीही हानी होऊ शकत नाही. तसे असेल तर हॅक करुन दाखवा, असं चँलेंजच शर्मा यांनी नेटिझन्सना दिलं होतं. त्यानंतर अनेक हॅकर्सनी शर्मा यांच्या गोपनीय माहिती मिळवल्याचा दावा केला. इलियट अँडरसन या फ्रान्सच्या सुरक्षा तज्ज्ञाने तर शर्मा यांची बरीच गोपनीय माहिती उघड केली. एथिकल हॅकर्स या ग्रुपने तर थेट शर्मा यांचे बॅंक डिटेल्स मिळवून पेटीएम आणि भिम अॅपद्वारे १ रुपया पाठवल्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *