711308-sindhu-final-afp

World Badminton Championships 2018 : पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत धडक

क्रीडा

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बँडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने आज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने इंडोनेशियाच्या फित्रीयानी हीचा उपउपांत्यपूर्व फेरीत २१-१४, २१-९ असा पराभव केला.
सिंधूची स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड सुरु आहे. आज तिची गाठ इंडोनेशियाच्या फित्रीयानी हिच्याशी पडली. या सामन्यातील पहिल्या गेममध्ये सिंधूला विजयासाठी काही काळ झुंजावे लागले. अखेर २१-१४ अशा फरकाने सिंधूने तो गेम जिंकला. त्यानंतर दुसरा गेमही संघर्षपूर्ण होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने पूर्ण वर्चस्व राखले आणि दुसरा गेम २१-९ असा अगदी सहज जिंकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *