narayan rane

मला कळलेले … श्री. नारायण राणे

अग्रलेख महाराष्ट्र

संतोष कांगणे (मुंबई )
बाळासाहेबांच्या सच्या शिलेदारांपैकी एक ज्याच्या कर्तुत्वावर विश्वास ठेऊन साहेबांनी नगरसेवक ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री अशी पदे भूषवण्याचा मान दिला आणि राणे साहेबांनी तो विश्वास नेहमीच सार्थ ठरवत प्रत्येक पदाला न्याय दिला .

निवडणुकीच्या काळात स्व:ताचा मतदार संघ सोडुन संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षासाठी काम करणारा हा एकच नेता आहे, ज्यामागची भावना एकच होती माझे काही झाले तरी चालेल, परंतु माझा पक्ष जिंकला पाहिजे .

राणे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले ज्याची आजही वाहवा केली जाते . सगळ्यात जलदगती ने काम करणारे सरकार अशी त्या कार्यकाळाची ओळख आहे . साहेब कांग्रेस मधे असतना सुद्धा दिलीश्वरांच्या समोर न झुकता त्यानी आपला मराठाबाणा कायम राखला. त्यांची अभ्यासपूर्ण काम करण्याची पद्धत, निर्भिडपणे मत मांडण्याची शैली यामुळेच मराठा आरक्षणा संदर्भात अभ्यास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष राणे साहेबांना करण्यात आले.

साहेबांनी मराठा आरक्षणसंदर्भात माहिती गोळा केली. डेटा एनालिसिस केला. वरचेवर अभ्यास न करता सखोल अभ्यास करुन .. नारायण राणे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला १६ % आरक्षण देऊ शकतो असा अहवाल सादर केला. सरकारने १६ % आरक्षण जाहिर सुद्धा केले.

परंतु त्यांनतर सादर झालेल्या जनहित याचिकेत कोर्टात महाराष्ट्रात नव्याने निवडून आलेले युती सरकार आरक्षणासंदर्भात भक्कम बाजु न मांडू शकल्याने आरक्षणवार कोर्टातून स्टे आला.

त्यानंतर सुरु झालेल्या मराठा क्रांति मुकमोर्चात सर्व राजकरण्यांनी भाग घेतला. राणे साहेब सुद्धा त्यात होते, परंतु एक मराठा बांधव म्हणून ..
सरकाकडून आरक्षणाला होत असलेला विलंब पाहता मूक मोर्चाँचे रूपांतर ठोक मोर्चात झाले . मराठा बांधव रस्त्यावर उतरला तो पर्यंत ठीक होते परंतु जेव्हा एका मराठा बांधवाने पाण्यात उडी घेऊन जलसमाधी घेतली. दुसऱ्याने विषप्राशन केले. त्यानंतर राणे साहेबांच्या रुपातील एक बाप एक मराठा बांधव कसा काय शांत बसणार होता ?

त्यांना त्यांच्या बांधवांची ,तरुणांची ,बाघिणींची काळजी होती म्हणून त्यांनी आरक्षणसंधारबात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्तिति समजावली. त्यांनी स्वतःने आरक्षणा संदर्भात सखोल अभ्यास केला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याबाबत कायद्याच्या चौकातीतील काही बाबी अधोरेखित करुण दिल्या, जेणेकरून सरकार मराठा समाजाची बाजु भक्कमपणे प्रतिज्ञा पत्रात मांडू शकेल व समजाला लवकरात लवकर शांततेत आरक्षण मिळेल .माझ्या मते राणे साहेबांना ह्याची जाणीव होती की असे केल्याने समाजात काही राजकरण्यांत त्यांच्या बद्दल रोष निर्माण होईल परंतु त्यांची भावना ज्याला कर नाही त्याला डर कशाला हीच होती. काही लोक सोशल मीडिया मधे म्हणत होते त्यानी सेटलमेंट केली. त्यांना मोठेपणा हवा आहे तर अस मुळीच नाही .. जी व्यक्ति नगरसेवक ,आमदार ,विरोधी पक्षनेता , मुख्यमंत्री , खासदार अशी राजकीय पदे भूषवून झाला आहे. आर्थिक दृष्टया स्व:ताच्या मेहनतीने सबल आहे. त्यांना अश्या सेटलमेंटची गरज नाही. राहिला प्रश्न मोठेपणाचा तर मी त्यांची तुलना धोनी सोबत करेन. ज्याने देशाला क्रिकेट मधील सर्व पुरस्कार मिळवून दिले परंतु आज पण जेव्हा बक्षिस घेताना फोटोशूट करायचा असेल तेंव्हा मात्र तो विजयात महत्वाचा वाटा असताना देखील सहकाऱ्यांना श्रेय देतो.

उद्या आरक्षण मिळाल्यावरही राणे साहेब हेच बोलणार आहेत की हे माझ्या सर्व मराठा बांधवांचे श्रेय आहे. मी फक्त एक मराठा बांधव म्हणून माझी भूमिका बजावली.

मी आज या लेखातून किंवा माझ्या मनातील भावनेतून एवढेच बोलु इच्छितो की, माननीय राणे साहेबांना बळ दया. त्यांच्या सोबत रहा. आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार ,थोडा संयम ठेवा आणि राणे साहेबांसाठो चार ओळी लिहीन …

” मन शुद्ध तुझ ,गोष्ट आहे लाख मोलाची ,
तु चाल गड्या तुला र नाही भीती कोणाची , पर्वा भी कोणाची ”

 

yuva utthan

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *