LPG-1-644x362-1

सर्वसामान्य नागरिकांना धक्का,घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

देश

महागाईने आधीच बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक धक्का सरकारने दिला आहे.कारण विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ३५.५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरही महाग झालं असून, १.७६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अनुदानित गॅस आज मध्यरात्रीपासून १.७६ रुपयांनी महाग झाला आहे. ४९६.२६ रुपयांवरून तो ४९८.०२ रुपये झाला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यासंदर्भात आज माहिती दिली. गॅस दरवाढीमागे जीएसटी हे कारण असल्याचे इंडियन ऑइलने म्हटले आहे. यापूर्वी १ जुलै रोजीच गॅसचे दर २.७१ रुपयांनी वाढवण्यात आले होते. दर महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या किमतीचा आढावा घेऊन दरामध्ये चढउतार केला जात आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *