global kokan

ग्लोबल कोकण महोत्सव २०१९ ! कोकणचा आंतरराष्ट्रीय ब्रँड

महाराष्ट्र मुंबई व्यापार

संजय यादवराव मुख्य संयोजक ग्लोबल कोकण

स्वप्नभूमी , निसर्गभूमी , देवभुमी कोकण . देशातील सर्वात महत्वपूर्ण प्रदेश . निसर्ग पर्यटन , सागरी पर्यटन , साहसी पर्यटन , बॅकवॉटर पर्यटन , आधुनिक मत्स्यउद्योग , शेती , फलोद्यान , हापूस आंबा विकासाच्या प्रचंड संधी असलेला प्रदेश .

पनवेल आंतरराष्ट्रीय , चीपी , रत्नागिरी विमानतळ , शिवडी न्हावा सागरी पूल , मुंबई सावंतवाडी चौपदरी रस्ता ,सागरी महामार्ग , जलवाहतूक , जेएनपीटी , दिघी , जयगड वेगाने विकसित होणारी बंदरे यामुळे कोकण हा उदयोन्मुख जागतिक महासत्ता भारतभूमीच्या आर्थिक विकासाचा केंद्र बिंदू होणार आहे .

कोकणातील निसर्ग समृद्धी , पर्यटन उद्योग ,शेती , हापूस , फलोद्यान , मत्स्यउद्योग , पायाभूत सुवीधा , विकासाच्या आणि उद्योगांच्या संधी लोककला , संस्कृती , खाद्य पदार्थ यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा महोत्सव म्हणजेच ग्लोबल कोकण .

एका प्रदेशाचा जागतिक ब्रँड निर्माण करणारा देशातील एकमेव आणि सर्वात भव्य महोत्सव . ग्लोबल कोकण २०१९ हा सलग सातवा आंतराष्ट्रीय महोत्सव नेस्को एग्ज़िबिशन सेंटर , गोरेगाव येथे दि. ४ ते ६ जानेवारी २०१९ दरम्यान कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित करीत आहे . दरवर्षी या महोत्सवाला ३ ते ४ लाख कोकणप्रेमी उपस्थित राहतात . तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद याहीवर्षी मिळेल असा विश्वास आहे .

 

incense sticks

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *