bbd052b01d3e48109ad1b00b3b5ae35e

अलिबागच्या किनाऱ्यालगत अवैध बंगल्यांवर कारवाई करा – उच्च न्यायालय

कोकण गावाकडच्या बातम्या

अलिबागच्या किनाऱ्यालगत बॉलिवूडमधील सिनेस्टार तसेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी बांधलेल्या बेकायदा बंगल्यांबाबत उच्च न्यायालयाने सरकारची खरडपट्टी काढली. या बंगल्यांना अभय का दिले जाते ?असा सवाल उच्च न्यायालयाने केला.
अलिबाग किनाऱ्यावरील अनधिकृत बंगल्यांविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी न्या.अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज झाली. गेल्या अनेक वर्षापासुन सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या या बंगल्यांकडे रायगड जिल्हाधिकारी कानडोळा का करतात. त्यांच्या विरोधात कारवाई का केली जात नाही अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आणि चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
अलिबागच्या किनारपट्टीच्या वर्सोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे या गावांमध्ये फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यासह बॉलिवूडमधील सिनेस्टार, मोठया व्यापाऱ्यांनी जमीन खरेदी केली आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन हे बंगले उभारले. या परिसरात सुमारे 175 बंगले बेकायदा उभारलेले आहेत. शेतीसाठी खरेदी केलेल्या या जमिनीवर हे बंगले उभारण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *