0601bf4e7dc962672aff020b64b7fefa

महिलेचा मंत्रालयसमोर रॉकेल ओतून अात्महत्येचा प्रयत्न

मुंबई

मंत्रालयासमोर एका महिलेने अात्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. गेटसमोर एका ५० वर्षीय महिलेने स्वत:च्या अंगावर राँकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला आहे. जवळच असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत महिलेकडे धाव घेत तिला आत्महत्या करण्यापासून रोखले.
बीड जिल्ह्यात राहणाऱ्या राधाबाई साळुंखे यांनी बुधवारी सकाळी मंत्रालयसमोर स्वतःवर रॉकेल ओतून अात्महत्येचा प्रयत्न केला. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे समजते. साळुंखे यांना मंत्रालयातील सुरक्षा विभागाने तातडीने ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *