siddhivinayak-temple_151558617795

अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांची गर्दी

मुंबई

अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.अंगारकी चतुर्थी हा गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो. त्यामुळे या दिवसाची गणेशभक्त वर्षभर वाट पाहात असतात.
सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. सिद्धीविनायकाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री १२ वाजता सिद्धीविनायकाची विशेष महापूजा करण्यात आली. चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष स्थान असून या दिवशी भक्तांकडून गणपतीची मनोभावे पूजा केली जाते, त्यामुळे आज सकाळपासूनच येथे भक्तांची रीघ पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *