narayan rane

माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांचा कोकणात झंझावाती दौरा

महाराष्ट्र

१ आॅगस्टला चिपळूणमध्ये तर २ रोजी रत्नागिरीत जाहीर सभा

चिपळूण (कुमार चव्हाण) :  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर माजी मुख्यमंत्री तथा खा.नारायण राणे यांनी महाराष्ट्रात झंझावाती दौऱ्याला सुरूवात केली आहे. त्यांची पहिली सभा कोल्हापूरमध्ये तर दुसरी सभा औरंगाबादला झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. येत्या १ व २ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे वादळ चिपळूण व रत्नागिरीत धडकणार आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खा.नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्यात नारायणराव राणे यांची तोफ धडाडणार असून त्यांचे स्फूर्तीदायक विचार ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभा यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. चिपळूण व रत्नागिरीत पक्षाचा जाहीर सभा घेऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न असणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेसाहेब नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिपळुणातील ही जाहीर सभा कापसाळ येथील माटे सभागृहात तर रत्नागिरीतील जाहीर सभा विवेक हॉटेलच्या मराठा मैदानावर होणार आहे. या दोन्ही जाहीर सभेची जय्यत तयारी सुरु आहे.

 

yuva utthan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *